“शिक्षकांसाठी डिजिटल सक्षमीकरणाचा अभिनव उपक्रम!” रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि लोटस कम्प्युटर तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम यशस्वी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि लोटस कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील सर्व शिक्षकांसाठी टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम – डिजिटल एम्पॉवरमेंट फॉर टीचर्स हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज सभागृह, तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला.

 

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, “डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ घडवून आणावी, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी केले. स्वागत व सत्कार डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर आणि डिस्ट्रिक्ट लिटरसी टीमचे रो. सारंग माताडे यांचा करण्यात आला.

Advertisement

 

या वेळी बोलताना रो. वसंतराव माळुंजकर म्हणाले, “शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार, कधीही, केव्हाही आणि कुठेही शिकता येईल असे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जात आहे. या डिजिटल स्किल्समुळे शिक्षक अधिक प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवू शकतील.”

 

रोटरी क्लबचे सचिव व डिस्ट्रिक्ट को-डायरेक्टर रो. संदीप मगर यांनी शिक्षकांना पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्षात ॲप इन्स्टॉलेशन करून त्याचा वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली.

 

कार्यक्रमात भाऊसाहेब आगळमे (मुख्याध्यापक, पावना विद्या मंदिर) यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रो. लक्ष्मण मखर यांनी केले.

 

विशेष सहकार्य:

 

रो. संतोषजी खांडगे

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे सदस्य:

 

रो. प्रवीण भोसले, रो. संदीप मगर, रो. बाळासाहेब शिंदे, रो. विन्सेंट सालेर, रो. सचिन कोळवणकर, रो. लक्ष्मण मखर, रो. योगेश शिंदे, रो. अंतोष मालपोटे, रो. उमा पवार, रो. सुषमा गराडे.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page