तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना धनुर्वात लसीकरण

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

Advertisement

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरणानंतर रोटरी क्लबच्या डॉ नेहा कुलकर्णी म्हणाल्या की स्वच्छता कर्मचारी हेच प्रत्यक्षात समाजाच्या आरोग्याचे रक्षक आहेत. त्यांच्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य टिकून राहते त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे आणि धनुर्वात लस त्यासाठी प्रभावी संरक्षण देते. कार्यक्रमादरम्यान उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष श्रीशैल मेंथे व डॉ नेहा कुलकर्णी यांचा सत्कार केला तसेच नगर परिषदेच्या आस्थापना विभाग प्रमुख नेहा पाटील यांनी डाॅ वर्षा वाढोवकर. प्रसाद मुंगी. प्रमोद दाभाडे यांचा गौरव केला. या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीशैल मेंथे. सदस्य प्रमोद दाभाडे. प्रसाद मुंगी. तसेच डॉ वर्षा वाढोवकर. डॉ नेहा कुलकर्णी यांच्या सहकार्याने नगर परिषदेतील सर्व चतुर्थ श्रेणी स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी. अधिकारी वर्ग यांचे धनुर्वात लसीकरण करण्यात आले. या शिबिरात एकूण २५० कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपरिषदेचे आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक सुनील काळकुटे. शहर समन्वयक रणजीत सूर्यवंशी यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अर्चना काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे व डॉक्टर टीमचे आभार मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page