“ज्ञानज्योती पुरस्काराने गौरवले पांडुरंग पोटे सर”

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे येथील परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पांडुरंग रामभाऊ पोटे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.

हा पुरस्कार अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन (कोल्हापूर-पुणे शाखा) यांच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी पुण्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, कोरेगाव पार्क येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे श्री. शेखर गायकवाड, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुऱ्हाडे पाटील, प्रा. प्रकाश कोळी, मास्टर ट्रेनर विवेक गुरव, तसेच संस्थापक अध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

पोटे सरांनी गेल्या पाच वर्षांत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटी रुपयांची कामे सामाजिक संस्था व सीएसआर फंडातून पूर्ण केली. यात सौरऊर्जा प्रकल्प, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, डिजिटल वर्ग, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्वतंत्र स्वच्छतागृहे, ग्रंथालय व वाचनालय यांचा समावेश आहे.

त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे परांजपे विद्यालयाने गुणवत्ता संवर्धन अभियानात मावळ तालुक्यात प्रथम तर पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

ज्ञानज्योती पुरस्काराने पांडुरंग पोटे सरांचा सन्मान होऊन शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित झाला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page