*शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार: DRDO जमीन संपादन प्रकरणात वाढीव पुनर्वसनाच्या मागणीला गती – रविंद्र भेगडे*

SHARE NOW

मावळ :

पुणे जिल्ह्यातील मौजे तळेगाव दाभाडे व शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या DRDO मार्फत संपादित जमिनीच्या वाढीव पुनर्वसन अनुदानाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्ली येथे संपन्न झाली.

दोन दिवसांपूर्वी मावळ भाजपा नेते विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांना कोर्टाच्या आदेशानुसार वाढीव अनुदानाची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत फडणवीस साहेबांनी देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विनंती केली

Advertisement

या अनुसरून आज केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण राज्यमंत्री श्री संजय जी शेठ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना वाढीव पुनर्वसन अनुदान मिळावे यावर सखोल चर्चा झाली.

या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, देहुगाव व देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, माजी अध्यक्ष लहू मामा शेलार आणि उद्योजक शरद मामा शेलार यांची उपस्थिती होती.

आजच्या बैठकीमुळे शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. लवकरच शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा वाढीव पुनर्वसन अनुदान मिळेल, असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केला असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page