माजी नगरसेवक सचिन टकले यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावात मोफत सरकारी योजना शिबिर संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

तळेगाव दाभाडे येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन टकले मित्र मंडळ आणि देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सरकारी योजना शिबिराचे मंगळवारी (दि. १५) आयोजन केले होते. या शिबिरात मतदान नोंदणी, दुरुस्ती अभियान, आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड, ई-केवायसी आदींचा समावेश होता. सुमारे ९० लाभार्थीनी याचा लाभ घेतला. या वेळी गणेश भेगडे, चिराग खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, सुनील कारंडे, रोहित लांघे, संजोग काळदाते, रवींद्र साबळे, अनिल वेदपाठक, सीताराम भोजने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page