वाघेशेरी डेअरीचे संस्थापक व शिवनंदन पतसंस्थेचे चेअरमन श्री. नंदकुमार झणझणे यांचा भाजप मध्ये प्रवेश

SHARE NOW

पुणे :

सासवडचे युवा नेते, वाघेशेरी डेअरीचे संस्थापक व शिवनंदन पतसंस्थेचे चेअरमन श्री. नंदकुमार झणझणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजे गटाला धक्का देत माजी खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा देऊन नंदकुमार झणझणे यांचे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत केले तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

यावेळी फलटण तालुक्याचे ज्येष्ट नेते श्री. प्रल्हादराव साळुंखे पाटील, सतकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. विलासराव नलवडे , युवा नेते श्री. धनंजय साळुंखे पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. जयकुमार शिंदे, सासवड भाजपचे नेते श्री. राजेंद्र काकडे, मंडल अध्यक्ष श्री. बापुराव शिंदे, मंडल अध्यक्ष श्री. अमित रणवरे, श्री. किरण जाधव, श्री. विक्रांत झणझणे , श्री. सतीश झणझणे , मा. सरपंच श्री. देवराम झणझणे , श्री. पांडुरंग आनपट व इतर मान्यवर उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page