पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी

SHARE NOW

लोणावळा:

Advertisement

यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे मुंबई या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे मुंबई हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा निश्चित फायदा होणार असून महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार आहे. घाट मार्ग मुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे तसेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावर आरामदायी प्रवास होणार असून मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण ३ बोगदे असून यातील एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदीचा आहे. देशातला सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल येथे बांधण्यात येत असून त्याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगत म्हणाले की मिसिंग लिंक प्रकल्प हा अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करत आहेत. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी यावेळी प्रकल्पाविषयी माहिती दिली. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाच्या पाहणीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस. उपमुख्यमंत्री शिंदे. मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे. माजी राज्यमंत्री संजय( बाळा) भेगडे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी. कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अनेक अधिकारी व अभियंते यावेळी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page