देहूगाव येथे इंद्रायणी नदी मध्ये तेरा वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

SHARE NOW

देहू :

देहूगाव जवळ इंद्रायणी नदी मध्ये मित्रांबरोबर पोहण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मित्रांबरोबर पोहोण्याचा आनंद घेत असताना मुलगा पाण्यात बुडाला ही घटना शुक्रवार दिनांक १६मे २०२५ रोजी दुपारी बोडकेवाडी देहू येथे घडली. तरुण विष्णू गुप्ता (वय १३. राहणार देहूरोड विकास नगर) असे बुडालेल्या मुलाचे नाव असून प्राप्त माहितीनुसार तरुण गुप्ता आपल्या मित्रांबरोबर देहूगाव जवळील बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदी मध्ये पोहोण्यासाठी आला होता.

Advertisement

पोहण्याचा आनंद घेत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे. अनिल आंद्रे. गणेश गायकवाड. भास्कर माळी. अनिश गराडे. कुंदन भोसले. गणेश सोंडेकर यांनी तरुण गुप्ता याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविले अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा वायरल व्हिडिओ पाहून अनेक जण हळहळ करताना दिसत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page