तळेगावात रानटी माकडाचा उच्छाद, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण
तळेगाव दाभाडे: शहरातील राव कॉलनी मध्ये एका रानटी माकडाने उच्छाद मांडला आहे. हे माकड शहराच्या जवळील डोंगरावरून राव कॉलनी मध्ये ११जुन २०२५ रोजी साधारणपणे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आले असून त्या माकडाने राव कॉलनीमध्ये उच्छाद मांडला आहे. या माकडाच्या हल्ल्यात अनेक कावळे जखमी व मृत पावले आहेत. परिसरातील नागरिक या प्रकारामुळे भयभीत झाली असून येथून येणारे जाणारे नागरिक व लहान मुलांना या माकडामुळे धोका होऊ शकतो तरी वनविभागाने या उच्छाद मांडत असलेल्या माकडाला जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी राव कॉलनी येथील नागरिकांनी केली आहे.