*डॉ. भाऊसाहेब सरदेसाई स्मृतिदिन निमित्त आदरांजली*
तळेगाव दाभाडे :
जनरल हॉस्पिटलचे आद्यसंस्थापक डॉ. भाऊसाहेब सर देसाई यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या समाधी समोरील स्थळी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या वतीने भाऊ साहेबांना आदरांजली वाहण्यात आली! यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन शैलेश शहा यांनी हॉस्पिटलच्या भविष्यकालीन विविध प्रकल्पाची माहिती दिली
यानंतर नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी डॉ. भाऊ साहेबांच्या वैद्यकीय प्रवासातील समर्पित जीवन प्रणालीचा आलेखच विद्यार्थ्यांसमोर उभा केला! संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, कोषाध्यक्ष विनायकजी अभ्यंकर, संचालक हेमंत सरदेसाई, नितीन सरदेसाई आणि सरदेसाई परिवारातील सदस्य, नर्सिंग स्कूलच्या प्रिन्सिपल मोनालिसा आदींनी समाधीस पुष्प अर्पण करून भाऊसाहेबांना आदरांजली समर्पित केली! स्मृतिदिनाचं औचित्य साधून नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी- व्यक्तिमत्व विकास या विषयावर रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांनी व्याख्यान आयोजित केलं होतं! रोटरी अध्यक्ष रोटेरियन कमलेश कारले यांनी प्रमुख व्याख्याते डॉक्टर सुमेधा भोसले- श्रीमान मनोज गोखले तथा सर्व उपस्थितांचे स्वागत केले! त्याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले! प्रकल्प अधिकारी रोटेरियन दीपक शहा यांनी आभार मानले! डॉक्टर शालिग्राम भंडारींनी पालकमंत्री या नात्याने– समयोजित संगीत काव्यपंक्ती- शेरोशायरीने विद्यार्थ्यांना उत्साही करीतच- रोटरी क्लब विषयी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली! विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण असलेला उपक्रम यशस्वी होण्यास- नर्सिंग स्कूलच्या कार्यक्षम प्राचार्य मोनालिसा आणि त्यांचा सर्व शैक्षणिक- व्यवस्थापकीय कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.






