पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका — माननीय श्री.गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांना “माझी वसुंधरा मित्र” राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन पुरस्कृत “माझी वसुंधरा मित्र”या अधिकृत अभियानांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य तसेच प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांबद्दल उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल
सन्माननीय श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांना प्रतिष्ठेचा
“माझी वसुंधरा मित्र” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान माननीय पंकजा गोपीनाथ मुंडे (मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य) आणि माननीय राजश्री भोज (भाप्रसे), सचिव, पर्यावरण व वातावरणीय विभाग, महाराष्ट्र राज्य* यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.
सन्माननीय श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे हे अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध अभियानांद्वारे नागरिकांना हरित उपक्रमात सहभागी करून घेतले असून, *“निसर्गाचे रक्षण म्हणजेच जीवनाचे संरक्षण”* हा संदेश समाजात पोहोचवला आहे.
अलीकडेच सन्माननीय श्री.गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांनी राज्यभरात वाढत्या बायो-मेडिकल वेस्ट आणि गारबेज कलेक्शन पिशव्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
त्यांनी निदर्शनास आणले की महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या नियमांनुसार तयार केल्या जात नाहीत, त्यामुळे त्या बेकायदेशीर व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहेत.
शिंदे यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती केली आहे की या विषयावर गांभीर्याने विचार करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रदूषणकारक घटकांवर नियमित नियंत्रण ठेवावे.
त्यांच्या म्हणण्यानुसार — “निसर्ग आणि पर्यावरण यांचे संरक्षण केले तरच मानव आणि प्राणी निरोगी, प्रदूषणमुक्त वातावरणात जगू शकतील.”
सन्माननीय श्री.गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांच्या या प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढत असून, समाजात हरित विचारांची रुजवात होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे.






