*भक्तीरसात न्हाले तळेगाव*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे शहरात आषाढी एकादशी निमित्त ठिक ठिकाणी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शाळा चौक,नीलकंठ नगर, माळी आळी तसेच तळेगाव स्टेशन भागातील विठ्ठलवाडी,जोशी वाडी,येथे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधीस सुरुवात झाली होती.

Advertisement

शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे उद्योजक संदीप काकडे, गौरी काकडे माजी नगरसेविका मंगलाताई काकडे परिवाराकडून पांडुरंगाची महाआरती व महाभिषेक करण्यात आला. चारुशीला हुलावळे या परिवाराकडून महापूजा करण्यात आली.यावेळी अतुल देशपांडे यांनी पौराहित्य केले. सायंकाळी हभप श्रीपाद बुवा अभ्यंकर पुणे यांचे कीर्तन आणि भजन सोहळा संपन्न झाला.

मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच विद्युत रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली होती.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page