*कन्या शाळा क्रमांक चार मध्ये योग दिन उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार तळेगाव दाभाडे मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त 21/ 6 /2024 रोजी नगर परिषद शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Advertisement
त्यामध्ये विविध प्रकारची योगासने ,सूर्यनमस्कार ,संगीत हालचाली विद्यार्थ्यांच्या करून घेण्यात आल्या.निकिता शितोळे व बेबी जाधव यांनी विद्यार्थिनींना योगदिनाचे,व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले.सेवानिवृत्त शिक्षिका चेतना असर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने ,वैशाली साबळे ,आशा गायकवाड, विक्रांती गरड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.






