करिअर कडे आव्हान म्हणून बघा – पल्लवी गंधालीकर

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : भारत आज लोकसंख्येच्या बाबतीत जगात अग्रेसर आहे. तंत्रज्ञानात रोज नवनवे बदल होत आहेत. सध्याच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा गवगवा होत आहे आणि त्यामुळे नोकऱ्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या स्वायत्त होण्याची गरज असल्याचे मत बजाज सीएसआर च्या प्रमुख पल्लवी गंधालीकर यांनी व्यक्त केले. बजाज सीएसआर आणि इंद्रायणी महाविद्यालयाचा बीबीए-बीसीए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बँकिंग, फायनान्स आणि इनशूरन्स क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

 

याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सनदी लेखापाल सुशांत परख, बीबीए-बीसीए च्या विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे, निर्मल गोहिल, रूक्मिणी शर्मा, प्रा. रुपकमल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कर्यकमाचे स्वागत व प्रास्ताविक

Advertisement

बीबीए-बीसीए विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देताना त्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देणे गरजेचे आहे आणि यासाठी बीबीए-बीसीए विभाग कायम कटिबद्ध असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सनदी लेखापाल सुशांत परख म्हणाले की, आपल्यातील संघर्षाची वेगळी चुणूक दाखवत विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून विद्यार्थ्यांनी संघर्षापासून लांब जाता कामा नये.इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे नियामक मंडळ खुप कार्यक्षम असल्याचे सांगत संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल परख यांनी समाधान व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि उत्तुंग ध्येय समोर असेल तर अवघड काहीच नसते. विद्यार्थीदशा ही आयुष्याला वळण देण्याची योग्य वेळ असते. तसेच विद्यार्थ्यांनी संयम, प्रगल्भता आणि सकारात्मकता सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे असल्याचे मत डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून झालेला फायदा आणि त्याबद्दल आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विल्सोनिया नडार यांनी केले. तर आभार प्रा. स्नेहल मासुरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page