सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*
सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये स्नेहसंमेलन शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी
बालवाडी ते इ.१०वी असे अत्यंत आनंदात साजरे झाले.दोन सत्रात साजरे झालेले हे स्नेहसंमेलन बालवाडी व माध्यमिक सकाळच्या सत्रात व इ. १ली ते ७वी प्राथमिक विभागाचे दुसऱ्या सत्रात साजरे झाले.सकाळच्या सत्रात मा. श्री .अनंत दाणी ( उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद ,पुणे माध्यमिक विभाग ) , मा.श्री.विठ्ठलराव शिंदे (मा.सभापती पंचायत समिती मावळ) हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणिती वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते ,त्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तर दुपारच्या सत्रात मा.श्री. मुकुंद तनपुरे (केंद्रप्रमुख लोणवळा)व मा.श्री. सुहास धस ( केंद्रप्रमुख सांगिसे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन्ही विभागातून दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ईशस्तवन व स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. अहवाल वाचन बालवाडी प्रमुख सोनाली काशिद ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री नवनाथ गाढवे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा परदेशी यांनी केले. प्रथम सत्रात प्रास्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.दिलीप कुलकर्णी यांनी तर द्वितीय सत्रात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश झेंड सर यांनी केले. तसेच हस्तलिखित मासिकाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे वाचन प्रथम सत्रात सौ. सुरेखा रासकर व द्वितीय सत्रात कु. अर्चना भोते यांनी केले.
नात …रक्ताच असत! नात ….भक्ताच असत! नात .. ..भावभावनांच असत! अशाच नात या थीम मधून विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमात सादरीकरण बालवाडी ,प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले. या विविध गुणदर्शनचे वाचन सौ.सोनल शेटे , सौ.शोभा जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश झेंड सर, उपाध्यक्ष मा. श्री दिलीप कुलकर्णी,कार्यवाह मा.श्री प्रमोद देशक, खजिनदार सौ सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती सदस्या डॉ. ज्योतीताई चोळकर ,सदस्य मा. श्री सुनिल आगळे सर, मा.श्री विश्वास देशपांडे तसेच इंदोरीच्या बालवाडी विभाग प्रमुख सौ. अनुराधा बेळणेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नितीन शिंदे हे सर्वजण उपस्थित होते तसेच सर्व पत्रकार , पोलीस, सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या सौ. सुनिता कुलकर्णी तर प्राथमिक विभागाचे सूत्रसंचालन कु.अस्मिता ढावरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन माध्यमिक विभागात बालवाडी शिक्षिका सौ. अर्चना एरंडे. तर प्राथमिक विभागात सौ. अनिता कुंभार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले आहे.






