बालम शेख यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष तथा इंग्लिश विषयाचे अध्यापक बालम शेख यांना यंदाचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या ते मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

मावळ तालुक्यातील ग्रामीण शाळांमध्ये बालम शेख यांच्या कार्यकाळात गेली सलग 24 वर्षे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल शंभर टक्के उत्तीर्ण असा लागला असून शिक्षणापासून वंचित मुले, मुली आणि महिलांना दहावी बहिस्थ परीक्षेला बसवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. याकामी त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रिजवाना यांचाही सत्कार करण्यात आला.

Advertisement

 

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ, जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ आणि जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्यातर्फे त्यांना स्व.मा. आमदार शिवाजीराव पाटील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. एस्. ढोमसे, राज्य टीडीएफ चे अध्यक्ष जी. के. थोरात आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा स्नेहल बाळसराफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

यावेळी रिजवाना शेख, वर्षा बारबोले, किसन पाटील, सुनिल मंडलिक, शशिकांत कोळेकर,अशोक काळे, शिंदे महादेव, प्रमोद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page