पवना शिक्षण संकुलात नवगतांचे स्वागत
पवनानगर: पवनमावळ भागातील ३५ गावे वस्तीसाठी म्हत्वाची समजली जाणारी पवना शिक्षण संकुल येथे पवना प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६- २७ या नवीन वर्षामध्ये नवगतांचे उत्साहपुर्ण वातावरणात ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर ठाकर , शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, पवनानगरचे उद्योजक अतुल कालेकर , आरोग्य अधिकारी वसीम तांबोळी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कॅशिअर किसन बिडकर,रासनकर, संकुलाच्या प्राचार्या सौ शितल शेटे मॅडम संकुलाचा सर्व स्टाफ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व छोट्या चमूंचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले .त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिक विभागाच्या मुलांच्या हाताचे ठसे तसेच मिकी माऊस सोबत फोटो काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट तसेच पेन्सिलचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती वडगाव मावळच्या वतीने देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अतिथींच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संकुलाचे माजी विद्यार्थी उद्योजक ज्ञानेश्वर ठाकर म्हणाले की विद्यार्थ्यांना शिकून मोठे व्हा ,आपल्या परिसराचे देशाचे नाव मोठे करा तसेच वाढत्या उष्माघातामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे त्यामुळे या पावसाळ्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन मनोगतातून दिला. संकुलाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संकुलाच्या प्राचार्या शितल शेटे यांनी सांगितले की, मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली पाहीजे,मराठी शाळांचे महत्व वाढले तर मराठी शाळा टिकतील यासाठी प्रवेशोत्सव साजारा करण्यात येतो मावळ तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोत्सव उत्साहात करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार वरघडे व आभार ज्येष्ठ अध्यापिका रोशनी मराडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले.






