उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर माळेगावात हल्ला…

SHARE NOW

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर माळेगावात हल्ला…

 

बारा जणांविरोधात गुन्हा दाखल…

 

बारामती : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) गावच्या हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघा मुख्य संशयितांसह अन्य दहा अनोळखी व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दौंड येथील निरीक्षक विजय वसंतराव रोकडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर जनार्दन धनगर, पिंटू गव्हाणे यांच्यासह अन्य दहा जणांविरोधात सरकारी कर्मचा-यांना मारहाण, सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक संपत्तीची हानी करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

 

माळेगावमधील विक्रमनगर येथे आरोपींच्या घरासमोर गुरुवारी (दि. २३) रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. या घटनेत सरकारी वाहन (एमएच १२, टीके ९६९२) व खासगी वाहन (एमएच १४, केएफ ८०८०) यांचे नुकसान झाले. तसेच फिर्यादीसह दुय्यम निरीक्षक गणेश बाबुराव नागरगोजे, सुभाष लक्ष्मण मांजरे, जवान प्रवीण रामचंद्र सुर्यवंशी, अशोक काशिनाथ पाटील, सागर रामचंद्र सोनवले हे जखमी झाले. फिर्यादी हे त्यांच्या सहका-यांसह तसेच पंचांसह शासकीय काम करत असताना आरोपींनी बेकायदा जमाव जमवून काठी, दगडाने मारहाण करून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वाहनांवर दगड मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

—————

 

दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री घरात येऊन हल्ला केल्याचा आरोप या आरोपींच्या कुटुंबातील महिलांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी निवेदन दिले आहे. मध्यरात्री घरात येत घरातील महिला-पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आली. गर्भवती महिलेलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली, असा आरोप त्यांनी केला आहे. माळेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देवा साळवे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी अद्याप ते तक्रार देण्यासाठी आले नाहीत. ते आल्यावर तक्रार नोंदवून घेऊ, असे सांगितले.

 

——————


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page