पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मावळ तालुका प्रथम – इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने रचला इतिहास
तळेगाव दाभाडे : क्रीडा व युवक संचालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी इंदापूर येथे झालेल्या पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय व्हाॅलिबॉल स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षीय वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला असून मावळ तालुक्यातील इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय इतिहास रचला आहे.
याप्रसंगी बक्षीस वितरण इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले आयोजन किरण पवार शाळेचे मुख्याध्यापक तसेच इंदापूर तालुका क्रीडा अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी एकूण ८ विभाग असणार असून पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधित्व इंद्रायणी ज्युनिअर कॉलेज मुलांचा संघ करणार असल्याबद्दल व त्यांच्या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे तसेच सर्व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य संदिप भोसले या सर्वांनी अभिनंदन करत पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी गोरख काकडे क्रीडा शिक्षक योगेश घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व खेळाडूंचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन






