*वडगांव शहरातील सर्व अंगणवाडीतील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट* *मावळ विचार मंच , जैन संघ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचा उपक्रम*
वडगाव :
वडगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी येथील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना मावळ विचार मंच , जैन संघ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या माध्यमातून उबदार स्वेटर भेट देण्यात आले.
मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांचे शुभहस्ते , मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, अध्यक्ष प्रशांत गुजराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी सरस्वती व्याख्यानमाला या माध्यमातून समाजाला विचाराचे संस्कार देत असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस देखील या लहान मुलांना नव राष्ट्र निर्मितीचे संस्कार देत आहेत आणि सकारात्मक पिढी घडवत आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री पोटोबा देवस्थान संस्थान अध्यक्ष किरण भिलारे, ॲड दामोदर भंडारी, नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मावळ विचार मंच कार्याध्यक्ष पुजाताई पिंगळे , कार्यक्रम प्रमुख भक्तीताई जाधव, मनस्विनी महिला मंच अध्यक्ष वैशालीताई ढोरे, राष्ट्रीय खेळाडू हर्षदाताई दुबे, स्वातीताई मुथा, श्रेया ताई भंडारी, अश्विनीताई बवरे, सुवर्णाताईगाडे, सारिकाताई भिलारे, मंदाकिनीताई वाघमारे, शीतल मुथा,
ज्येष्ठ मार्गदर्शक, नारायणराव ढोरे , डॉ.सुनील बाफना , पंढरीनाथ भिलारे , गंगाधरराव ढोरे, सुभाषराव ढोरे, सोमनाथ काळे , नंदकिशोर गाडे , अनंता कुडे, बाळासाहेब बोरावके , वसंतराव भिलारे, अनिशभाई तांबोळी, अजित देशपांडे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.सरपंच नितीन कुडे , योगेश म्हाळसकर, शिवानंद कांबळे , अजित मुथा , नगरसेवक प्रवीण चव्हाण, ॲड.विजयराव जाधव , प्रसाद पिंगळे , किरण म्हाळसकर , रवींद्र म्हाळसकर , श्रीधर चव्हाण , शरद मोरे , मकरंद बवरे, अतुल म्हाळसकर, कुलदीप ढोरे, वडगांव सोसायटी चे व्हा.चेअरमन गणेश भालेकर, जैन संघाचे प्रीतम बाफना , अमोल बाफना , गिरीश गुजराणी, दीपक शास्त्री,अजय भवार, अरुण सुळके , मुकुंद घनवट आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका प्रतिभाताई ढोरे , कांचनताई ढोरे, कल्पनाताई ढोरे, छायाताई धोंगडे , अर्चनाताई ढोरे, कमलताई शिंदे , चेतनाताई ढोरे , हर्षाताई ओव्हाळ , सुमित्राताई ढवळे, शालनताई कावडे , शकुंतलाताई नागे , मंदाताई चव्हाण यांनी नियोजन केले.
वडगांव गांवठाण , मधुबन , भिलारे वस्ती , मोरया कॉलनी , ठाकर वाडी , मिलिंद नगर , श्री खंडोबा मंदिर जवळ , केशव नगर, बाजारपेठ , चव्हाण वाडा , माळी नगर, कातवी या वडगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी मधील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना या उबदार स्वेटर ची भेट देण्यात आली.
सर्व अंगणवाडी मदतनीस , तसेच पालक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. स्वेटर ची भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद व्यक्त होत होता.
स्वागत प्रतिभाताई ढोरे यांनी केले
सूत्र संचालन मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी केले , आभार प्रदर्शन उपाध्यक्ष संतोष भालेराव यांनी केले.