रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा उपक्रम; अनेक विद्यार्थ्यांना लाभ

SHARE NOW

मावळ :रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष जी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश्वर वर्ल्ड स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ईएनटी (कान, नाक, घसा) मेडिकल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

हा प्रकल्प शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत यशस्वीरित्या पार पडला.

Advertisement

शिबीर यशस्वी करण्यासाठी पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटलची मेडिकल टीम, व्यंकटेश्वर वर्ल्ड स्कूलचा सर्व स्टाफ आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

विशेष योगदान देणारे सदस्य: रो. संदीप मगर, रो. विन्सेंट सालेर, रो. राजेंद्र पंडित, रो. सुनील भोंगाडे, रो. सुनील खोल्लम, रो. युवराज पोटे, रो. अंतोष मालपोटे तसेच फर्स्ट लेडी रागिनी भोसले.

सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page