तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शिवशंभू स्मारकाचे पुढील महिन्यात होणार अनावरण

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: शहराच्या पहिल्याच नियोजित शिवशंभू स्मारक समूह शिल्पाच्या १४ फूट उंच पुतळ्याचे बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा स्मारकाच्या ठिकाणी आगमन झाले असून हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने हे भव्य शिवशंभू शिल्प नियोजित चौथाऱ्यावर स्थानापन्न झाले.

या समूह शिल्पाचे पुढील महिन्यात अनावरण होणार असून शिवशंभू भक्तांचे दीड शतकाचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून नियोजित स्मारकाच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

हे शिवशंभु स्मारक उभे राहावे म्हणून शिव शंभू स्मारक समिती २००९ पासून अथक परिश्रम घेत होती. नगरपरिषदेने ९गुंठे जागा या स्मारकासाठी दिली असून एकूण १२ फुटाच्या दगडी चौथर्‍यावर १४ फुटाचे हे भव्य समूह शिल्प बसवण्यात येणार आहे.

 

पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी त्रिंबकेश्वर येथे गर्ग आर्ट स्टुडिओमध्ये दीड वर्षाच्या अथक परिश्रमाने ४टन वजनाचे ब्राॅझचे हे ओतिव शिल्प तयार केले आहे.

Advertisement

” लोकसहभागातून साकारलेले भव्य समूह शिल्प”

 

या स्मारकासाठी सुमारे ८५ लाख रुपये खर्च आला असून, हा सर्व निधी लोकसहभागातून जमा करण्यात आला आहे. आमदार सुनील शेळके आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी या कामात विशेष लक्ष दिले. नगरपरिषदेने स्मारकासाठी आवश्यक परवानग्या आणि निधीची तरतूद केली असून, एकूण १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे.

 

या संदर्भात बोलताना शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष वसंतराव भेगडे (पाटील) म्हणाले की या शिल्पातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती या ऐन उमेदीच्या काळातील आहेत. लोकसहभागातून हे शिल्प साकारण्यात आले आहे. ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहरातील पहिले आणि सर्वात मोठे ठरावे असे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी १६ वर्ष लागली मात्र लोकसहभागातून एवढे भव्य दिव्य स्मारक उभे राहिले याचा मोठा आनंद आहे.हे शिल्प तळेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे असून पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page