तळेगाव दाभाडे वाहतूक विभागातर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव वाहतूक विभाग अंतर्गत तळेगाव स्टेशन चौकातील चौकी याठिकाणी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास तळेगाव वाहतूक विभागाचे, अंमलदार,अधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. विशेष कामगिरी करणाऱ्या ए.एस. आय. गावडे, ए. एस. आय. पिचड, हवालदार रावण, हवालदार जाधव, हवालदार ननावरे आणि ऑर्डन भोसले, यांचा सत्कार करण्यात आला.