स्माईल व्यसनमुक्ती केंद्र उर्से आयोजित ‘स्माईल सायक्लोथॉन’ सायकल रॅली संपन्न

SHARE NOW

उर्से : २६ जून जागतिक अंमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त शनिवार दिनांक २८ जून रोजी ‘स्माईल सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन विशाल हिरे व संतोष परदेशी यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झाले. विविध घोषणा देत स्माईल सायक्लोथॉनची सकाळी ०६.३० वा. सुरूवात झाली.

या प्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे ,अंमली पदार्थ विरोधी पथकाचे व.पो.नि. संतोष पाटील ,रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो.संतोष परदेशी, उपाध्यक्ष रो. प्रशांत ताये, सचिव रो. प्रदीप टेकवडे ऍसीसटंट गव्हर्नर रो. दिपक फल्ले, क्लब ऍडमीन रो. बसप्पा भंडारी टेक्नोवेसचे संचालक निखिल महापात्रा स्माईलचे संस्थापक हर्षल पंडित तसेच प्रमुख अतिथी म्हणून आयर्न मॅन कझखस्थान धनराज हेळांबे, युथ आयकॉन सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, युथ आयकॉन सुरज जाट उपस्थित होते.

NDRF, CRPF तसेच CRPF बटालियन २४२ चे जवान, विविध सायकल क्लबचे सायकल स्वार, पोलिस व नागरिक असे साडेचारशे पेक्षा जास्त सायकल स्वार सहभागी झाले होते.

‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ तसेच व्यसनांच्या विरोधात विविध घोषणा देत स्माईल व्यसनमुक्ती केंद्र,उर्से येथे या रॅलीची सांगता झाली. संपूर्ण मार्गावर पाणी व थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती.

Advertisement

समारोप कार्यक्रमाची सुरुवात सायकल स्वारांच्या व मान्यवरांच्या स्वागताने झाली. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, व.पो.नि. संतोष पाटील, शिरगाव परंदवडी पो.स्टे. चे व.पो.नि. विशाल पाटील, सि.आर.पी.एफ चे झा साहेब, सारस्वत मॅडम अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.नशामुक्त भारत अभियानासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक सायकल स्वारास मेडल,टी शर्ट, प्रशस्तीपत्रक देण्यात आले नंतर सर्वांना नाष्टा व शीत पेय देण्यात आले.सर्व सायकल स्वारांसाठी प्रेरणा स्थान असणारे जेष्ठ साठे काका, व अतुल शेटे या मान्यवरांचा सत्कार पुणेरी पगडी, तुळशीचे रोप, व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. प्रशांत ताये यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे राहुल बोरुडे, रोहन यादव, नितिन नाटेकर, हर्षल जोशी, राहुल केळकर, जयंत खेर्डेकर, आनंद भागवत, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते अजिंक्य देशपांडे, अक्षय सांडीम, अमेय कुलकर्णी, गणेश गुंडरे, राजेंद्र ढूस, निलेश साळूंके, प्रशांत टोणगे यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन दिपक फल्ले यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page