राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सुहास गरूड
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास बळिराम गरूड यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे यांनी गरूड यांची निवड जाहीर केली.
आमदार सुनिलआण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते सुहास गरूड यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, जमीन हक्क परिषदेच्या अध्यक्षा करूणाताई सरोदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले .
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढीसाठी आपण काम कराल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना बळकटीसाठी काम करणार असल्याचे सुहास गरूड यांनी सांगितले.