*पत्रकारांकडून होणारा गौरव मला भविष्यकाळात नवी ऊर्जा देईल – अभिनेत्री – पूजा पवार साळुंखे* *पत्रकारांनी केलेला सन्मान म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती – आशा पाचपांडे*
पिंपरी चिंचवड:
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी – चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांती ज्योति सावित्रीबाई बाई फुले पुरस्कार वितरण तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान रणरागिणींचा भव्य पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात ए.एस.एम. कॉलेज सभागृह, पिंपरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून झपाटलेला चित्रपट फेम पुजा पवार – साळुंखे उपस्थित होत्या.
यावेळी यंदाचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे क्रांती ज्योति सावित्रीबाई पुरस्कार अभिनेत्री श्रृती उबाळे, उद्योगरत्न पुरस्कार कायनेटिक ग्रीन लि च्या.संचालक सुलज्जा फिरोदिया – मोटवानी, शिक्षण महर्षी पुरस्कार आशाताई पाचपांडे, राजकीय – सरिता साने ,रुपाली आल्हाट यांना,वैज्ञानिक निकिता कांबळे, प्रशासकीय पुरस्कार प्राजक्ता गोरडे यांना दिला.या वेळी वाय सी एम च्या गायनिक वैद्य उषाताई कुऱ्हाडे यांनि उपस्थित महिलांना विविध आजारांवर मात करुन आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. तर समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटातील महिलांचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पूजा पवार म्हणाल्या की जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने केलेला माझा सन्मान माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून पत्रकारांनी केलेला सन्मान हा मला फार महत्त्वाचा वाटतो. पत्रकारांकडून होणारा गौरव मला भविष्यकाळात नवी ऊर्जा देईल. पत्रकारांनी पुरस्काराच्या रूपाने कलेला दिलेली दाद आहे. राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार मला प्रेरणा देईल.
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी,
पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले,
जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड शहर डिजिटल अध्यक्ष विनय सोनवणे, सागर सूर्यवंशी, चिराग फुलसुंदर, महावीर जाधव, संतोष गोतवळे, पराग डिंगणकर, मारुती बाणेर,, संभाजी बारबोले, प्रसाद वडघुले,अशोक कोकणे, रमेश साठे,सिद्धांत चौधरी,प्रकाश जमाले, श्रध्दा प्रभुणे, देविदास लिमजे, आण्णा लष्करे, नरेश जिनवाल, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वडघुले यांनी केले तर सूत्रसंचालन.प्रा अपर्णाशिंदे… यांनी केले.आभार विनय सोनवणे यांनी मानले.