३१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत अॕड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात उदार उपक्रम

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

नूमविप्र मंडळ तळेगाव दाभाडे संचलित अॕड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी शैक्षणिक मदत वाटपाचा उपक्रम पार पडला.

ॲसेंचर जपानच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. सुजाता  कोळेकर यांच्या मार्गदर्शनातून आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असणारे तेजस लिमये, विकास निलजकर, प्रसाद भागवत, राहुल तेनी, अजित महाले, संदीप भाले, प्रितीश परमार, निखिल बिर्ला, जितेंद्र दत्ता शर्मा, संदीप जाधव, लक्ष्मणराज संकारलिंगम, अभिलाष के., अतुल लिमये, अनुप लिमये, सागर नेवे, हिमांशु गुप्ता व रवी पंजाबी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील एकूण ३१ गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी धनादेश प्रदान करण्यात आला.

Advertisement

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मदतीसाठी प्रयत्न केलेल्या अध्यापिका सुवर्णा काळडोके यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

मॅनेजर तेजस लिमये यांनी विद्यार्थ्यांना शाळेत मिळणाऱ्या गुरुकुल संस्कारांचा जास्तीत जास्त फायदा घेत शैक्षणिक प्रगती साधावी, उज्ज्वल भविष्य घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात शालेय भौतिक सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी शाळेतील विविध सोयीसुविधांचा आढावा घेत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी केले.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page