न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत आनंद बाजार उत्साहात संपन्न
मावळ
वडगांव मावळ-येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर, वडगांव येथे विद्याथ्यांमधील व्यावहारिक ज्ञान वाढवून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करणे या उद्देशाने घेतलेला आनंद बाजार मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भगवान कादे यांच्या शुभ हस्ते आनंद बाजारचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे गुरुकुल समन्व्यक श्री. देशपांडे सर व न्यू इंग्लिश स्कूल माध्य. व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री. Satish हाके सर हे होते. या मेळाव्यात विद्याथ्यांनी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ्याचे स्टॉल लावून ग्रामस्थ तसेच विधाथ्यांना खाद्य पदार्थ्याची विक्री करून व्यावहारिक ज्ञान अनुभविले. विद्याठ्यानी विक्रीसाठी साबुदाणा वडा, सामोसे, वडा पाव, पाणीपुरी, पोहे, चकली, चॉकलेट, हिरव्या भाजीपाला, नूडल्स, गुलाब जामून, पापड चाट हे पदार्थ्य विक्रीसाठी आणले होते. याप्रसंगी प्राचार्य सतीश हाके सर यांनी आनंद बाजाराचे विद्याथ्यांच्या जीवनात व्यावहारिक ज्ञान कसे प्राप्त होते याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे कौतुक केले. शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष भगवान कादे, सौ. आडकर मॅडम, तुर्डे ताई, मुख्याध्यापिका सौ. बारवकर ताई आदिसह सर्व पालक ग्रामस्थांनी ग्राहक बनवून विद्याथ्यांच्या खाद्य पदार्थायांचा आस्वाद घेतला. विद्याथ्यांनी खाद्य विक्रीचा अनुभव घेतला. आनंद बाजार यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार खाडे, ज्येष्ठ शिक्षक किरण नवले, सौ. स्वाती खुडे, निलेश गवई, सारिका अवचारे, सुमन दळवी, कीर्ती वहिले, वैष्णवी नांगरे, रीमा शिंदे, रेशमा गायकवाड आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किरण नवले यांनी केले तर आभार सौ. स्वाती खुडे यांनी मानले.






