*नवीन समर्थ विद्यालयात समर्थ शलाका शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा (इयत्ता नववी )संपन्न*
तळेगाव दाभाडे :
दिनांक 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी नवीन समर्थ विद्यालयात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. अॅड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने घेण्यात येणारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये संस्थेच्या सहा शाळांमधील इयत्ता नववीचे एकूण 110 विद्यार्थी पात्र ठरले होते पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व शाळांमधील अध्यापक,विद्यार्थी यांचे पेन देऊन प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत करण्यात आले. परीक्षेचे सह प्रकल्प प्रमुख संस्थेचे जेष्ठ संचालक व एकविरा विद्या मंदिर कार्ला या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री सोनबा गोपाळे गुरुजी तसेच नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री महेशभाई शहा,प्रगती विद्यामंदिर इंदुरीचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री दामोदरजी शिंदे तसेच परीक्षा समितीतील श्री दिलीप पोटे सर, श्री उमेश इंगुळकर सर याप्रसंगी उपस्थित होते .त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धात्मक परीक्षांचे आगामी काळातील महत्त्व लक्षात घेऊन समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचे एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर आयोजन करण्यात येते. संस्था आदेशानुसार व नियोजनानुसार या परीक्षेचे संयोजन समर्थ विद्यालयाच्या प्राचार्या सौ.वासंती काळोखे पर्यवेक्षक श्री शरद जांभळे, परीक्षा विभाग प्रमुख श्री बापूसाहेब पवार, श्री युवराज रोंगटे, श्री योगेश पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री संजय तथा बाळा भेगडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री गणेश खांडगे ,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव श्री संतोषजी खांडगे,सहसचिव श्री नंदकुमार शेलार, खजिनदार श्री राजेश म्हस्के, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कान्हे या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री यादवेंद्र खळदे ,ज्येष्ठ संचालक व पैसा फंड शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर, ज्येष्ठ संचालक श्री शंकरराव नारखेडे या सर्वांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.* परीक्षा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.