मावळच्या विकासासाठी कटिबद्ध असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे
पवनानगर ता.२३-
मावळच्या जनतेने भरभरून दिले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मत संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले
पवनानगर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, शिवसेनेचे संघटक अमित कुंभार , अंकुश देशमुख, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, दत्ता केदारी,आरपीआयचे तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ,पवना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, जवणचे माजी उपसरपंच संतोष भिकोले, शाखाप्रमुख किशोर शिर्के,काले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशा कालेकर, फुलाबाई कालेकर, छायाताई कालेकर, ग्रामसेवक रवींद्र वाडेकर,पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष
मुकुंद ठाकर आदी उपस्थित होते
यावेळी खासदार निधीतून काले पवनानगर येथील विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये पवना विद्या मंदीर सिमेंट रस्ता कॉंक्रीटीकरण १२ लाख रुपये, स्मशान भूमी रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण १० लाख रुपये तसेच सोलर (सौर )दिवे 10 लाख रुपये, या समाज उपयोगी रस्ता चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित कुंभार म्हणाले की,काले पवनानगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मागील दहा वर्षात खासदार फंडातून जास्तीत जास्त निधी मिळाला असून त्यामुळे भरीव कामे मार्गी लागली यापुढील काळातही बारणे साहेबांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करु
यावेळी पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, मावळच्या विकासामध्ये खासदार बारणे यांचे योगदान आहे विकासात राजकारण न आणता ग्रामीण भागासाठी जास्तीत निधी दिला जातो पवना विद्या मंदिर शाळेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १२ लक्ष रुपये निधी दिला आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब आगळमे सुत्रसंचलन सुमन जाधव, महादेव ढाकणे यांनी केले तर आभार रोशनी मराडे यांनी मानले