तहसिल कार्यालय मावळ यांच्या वतीने लोकशाही दिनाचे आयोजन
वडगांव मावळ
मावळ तहसिल कार्यालय यांच्या वतीने तळेगांव दाभाडे नगरपरिषद येथे सोमवार(ता.२१) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे. तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामस्थांच्या शासनाच्या विविध विभागांसंबंधी असलेल्या अडीअडचणी यावेळी सोडविल्या जाणार आहेत. तसेच पुरवठा (शिधापत्रिका) विषयक , संजय गांधी निराधार योजना आदी सुविधा देखील ग्रामस्थांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन विक्रम देशमुख यांनी केले आहे.