किवळे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन आठ दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे व पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

SHARE NOW

किवळे,

 

28 ऑगस्ट 2025 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) विकासनगर, किवळे यांच्या वतीने परिसरातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज भव्य जनआक्रोश आंदोलन आणि रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

प्रमुख मागण्या:

1. मामुर्डी ते मासुळकर कॉलनी मुंबई-पुणे रस्त्यावर सांगवडे कडे जाणाऱ्या मार्गावरील मोठे खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याचे मजबूत डांबरीकरण करावे.

2. मासुळकर कॉलनी परिसरातील सोसायट्यांमध्ये (लिटिल अर्थ, कुणाल आयकॉन, गोदरेज, सिटी वन, अडरसन, अर्बन, मासुळकर कॉलनी) पाण्याचा कमी दाब दूर करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकावी किंवा विद्यमान लाईन दुरुस्त करावी.

3. सोसायट्यांमधील कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करावी.

4. रस्ता खराब करणाऱ्या बिल्डर आणि RMC प्लांट मालकांकडून रस्ता दुरुस्त करून घेणे.

5. पावसाळा संपेपर्यंत नवीन इमारत बांधकामे तात्पुरती थांबवणे तसेच नवीन पाणी कनेक्शन न देणे.

 

अधिकाऱ्यांचे ठोस आश्वासन:

या आंदोलनादरम्यान महानगरपालिका पिंपरी-चिंचवड येथील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्थापत्य विभागाचे उपकार्यकारी अभियंता स्वप्निल शिर्के यांनी सांगितले की,

“पावसाने उघड दिल्यास आठ दिवसांत मजबूत डांबरीकरण केले जाईल. आजपासून दोन दिवसांत रस्त्यावरचे सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील. तसेच RMC प्लांट आणि बांधकामांमुळे रस्त्यांची नासधूस होत असल्याने संबंधित विभागांना पत्र पाठवून कारवाई केली जाईल.”

Advertisement

आरोग्य निरीक्षक कांचन गौडा यांनी “सोसायट्यांमधील कचरा नियमितपणे उचलला जाईल,” असे आश्वासन दिले.

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण धुमाळ यांनी सांगितले की,

“पंधरा दिवसांत किवळे येथील नवीन पाण्याची टाकी सुरू केली जाईल, ज्यामुळे लिटिल अर्थसह मासुळकर कॉलनी परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होईल.”

 

आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित:

अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत रस्ता व इतर समस्या सोडवण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व:

मा. धर्मपाल तंतरपाळे – उपाध्यक्ष, RPI पिंपरी-चिंचवड शहर

सौ. सिंधू धर्मपाल तंतरपाळे – अध्यक्ष, दिशा घरेलू महिला संघटना महाराष्ट्र राज्य

मा. दिलीपराव कडलक – ज्येष्ठ नेते, RPI मावळ लोकसभा

श्री. राजेंद्र तरस – जिल्हाप्रमुख, युवासेना मावळ लोकसभा

 

यावेळी मा. बाळासाहेब धावारे, अशोक अंभोरे, राजकुमार कलिमुर्ती, राजेंद्र यादव, यशवंत गजभिये, किरण कांबळे, मेघराज तंतरपाळे, नारायण खंडागळे, अजय बखारिया, निलेश बांगर, अनिल कांबळे, मनोहर राऊत, नवनाथ करमारे यांच्यासह सर्व सोसायट्यांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या आंदोलनामुळे प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला असून, पुढील आठ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास आंदोलन पुन्हा उग्र करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page