जागतिक महिला दिनानिमित्त श्री जैन विद्या प्रसारक मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

SHARE NOW

पिंपरी, प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १७५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरामध्ये १७ रक्तपेढी सहभागी झाल्या होत्या.

रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कुल आणि संघवी केशरी महाविद्यालय व रसिकलाल एम धारिवाल फार्मसी कॉलेज या दोन ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शांतीलाल कटारिया, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, सचिव अ‍ॅड. राजेंद्रकुमार मुथा, खजिनदार प्रकाश चोपडा, संयुक्त सचिव प्रा. अनिलकुमार कांकरिया, व राजेशकुमार साकला, विश्वस्त सतीश चोपडा, प्रवीण लुंकड, वालचंद संचेती, प्रकाश बंब, सर्व विश्वस्त, रुबी हॉल क्लिनिकच्या संचालिका डॉ. मुजुमदार, रक्ताचे नाते संस्थेचे राम बांगड, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

या शिबिरातील विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे अत्यंत दुर्मिळ असे रक्तदाते जे की फक्त महाराष्ट्रामध्ये 16 आणि जगभरात 400 आहेत. त्यापैकी एका रक्तदात्याने रक्तदान केले. दरम्यान, रक्तदान शिबिरासाठी आलेल्या महिलांची मोफत हिमोग्राम तपासणी करण्यात आली. तसेच महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करीत त्यांच्या रक्तामधील कमी प्रमाणातील हिमोग्लोबिविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आणि लोकजागृतीबाबत श्री जैन विद्या प्रसारक मंडळातील विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करून रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळविला. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ आणि श्री शांतीलाल भिकचंदजी कटारिया – आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्तपणे रक्तदात्यास अनोखी भेटवस्तू देण्यात आली.

या संस्थेने सन १९२७ पासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हेच कार्य पुढे नेण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page