इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

SHARE NOW

  1. तळेगाव दाभाडे :

 

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२६ मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. ज्यूतिका राजवडे (वरिष्ठ वैज्ञानिक, आघारक अनुसंधान संस्थान, पुणे) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. निरूपा कानीटकर होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य श्री. संदीप भोसले, श्री. उत्तम खाडप, डॉ. रोहित नागलगाव व अमृता सुराणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्राध्यापिका सौ. वृषाली दामोदरे यांनी केले व राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२६ “वूमन इन सायंस कॅटालायजिंग विकसित भारत” या विषयावर माहिती प्राध्यापिका सौ. राखी चौडणकर यांनी दिली.

कार्यक्रमात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. राजवडे यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून संशोधनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

विज्ञान दिनानिमित्त कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष मॉडेल्सच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या.

याचबरोबर वरिष्ठ विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन व संत ज्ञानेश्वर शाळा येथे जाऊन “समाजासाठी विज्ञान” हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सोप्या प्रयोगांद्वारे विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच वरिष्ठ विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “संशोधन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान विविध विज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीना सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान वरिष्ठ विभागातील विध्यार्थीनी कु. प्रिया मगर व कु.पूर्वा मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. ध्रुवीका बरोट यांनी केले. विज्ञानावर आधारित विविध स्पर्धा व उपक्रमांमुळे विज्ञान दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी याठिकाणी नमुद केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे व अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी विज्ञान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page