डॉ. राजकुमार लोढा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड..

SHARE NOW

कोंढवा : श्री बडमाता मंदिर संस्था मुंढवाच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली.

 

बडमाता मंदिर संस्थानची निवडणूक रीतसर पार पडली. निवडणूक अधिकारी पवन श्रीमाळी यांनी कामकाज पाहिले त्यावेळी त्यांनी माहिती दिली की अध्यक्षपदासाठी फक्त एकच नामांकन अर्ज प्राप्त झाला होता आणि तो नियमांनी निवडणूक प्रक्रियेनुसार पार पाडून श्री. राजकुमार कांतिलालजी लोढा (पुणे सुखसागरनगर) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

Advertisement

 

डॉ. राजकुमार लोढा यांनी काही काळ जेजुरी संस्थान च्या अध्यक्षपदी काम केले आहे. त्यावेळी जेजुरी संस्थानच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय देखील त्यांनी घेतल्याचे पहावयास मिळते. त्याच अनुभवाचा फायदा त्यांना या संस्थानच्या विकासासाठी होणार असल्याचे मत माजी अध्यक्ष मेघराज लोढा यांनी सांगितले. संपूर्ण समाजासाठी ही अभिमानाची अन आनंदाची गोष्ट आहे की असा धार्मिक, सेवाभावी, आणि समाज सेवा समर्पित व्यक्ती या पदासाठी अध्यक्ष झालेले आहेत. जेजुरी मार्तंड देवस्थानमध्ये अध्यक्ष पदावर काम करून राजकुमार लोढा यांनी

समाज आणि हिंदू धर्माप्रती असलेली निष्ठा आणि केलेली सेवा उल्लेखनीय आहे.या वेळी अध्यक्ष पदी निवडीबद्दल सकल जैन समाजाकडून, मित्र परिवाराकडून लोढा यांच्यावर शुभेच्छचा वर्षाव झाला आहे.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page