नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिराचे आदर्श मुख्याध्यापक यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा *राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२५*

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ परिवारातील,ॲड पु.वा.परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे शाळेचे शिस्तप्रिय व आदर्श मुख्याध्यापक यांना जाहीर झाला आहे.

पांडुरंग पोटे सर हे यांनी संस्थेच्या नवीन समर्थ विद्यालय येथे २८ वर्षे समाजशास्त्र विषायाचे ज्ञानदानाचे कार्य करत होते त्या कालखंडात अनेक विद्यार्थी घडवले यामध्ये अनेक डॉक्टर, इंजिनिअर, समाजसेवक, राजकरणी व वाव्यसायिक तयार झाले त्यांनतर संस्थेने तळेगाव येथील ॲड पु.वा. परांजपे विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली या कालखंडात पोटे यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, सचिव संतोषजी खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता संवर्धन अभियान या उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक तर पुणे जिल्ह्यात व्दितीय पुरस्कार मिळवून परांजपे शाळेच्या शिरोपेचात मानचा तुरा रोवला.

Advertisement

त्याचबरोबर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेचा अत्यंत मानाचा समजला जाणारा संस्थेचे संस्थापक सचिव स्व.अण्णासाहेब विजापूरकर गुणवंत शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ च्या वतीने आदर्श जिल्हा मुख्याध्यापक पुरस्कार, पंचायत समिती मावळ गुणवंत , तळेगाव दाभाडे नगरपरिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार असे विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांनी अनेक वर्षे संस्थेचा परिक्षा विभाग,संस्थेचे भांडार तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी सहप्रकल्प प्रमुख,मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत *सदर पुरस्काराचे वितरण (दि.१७) ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता* मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, कोरेगाव पार्क,पुणे येथे वितरत होणार आहे

पुरस्कार जाहिर झाल्याने विविध स्तरातुन कौतुक होत आहे


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page