पुणे पीपल्स बँकेचा ” बैंकिंग गप्पा ” हा संवादात्मक कार्यक्रम संपन्न :-
पुणे (प्रतिनिधी )
पुणे येथील पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. या बहुराज्यीय सहकारी बँकेने बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट येथे बँकिंग काल, आज व उद्या यावर आधारीत बैंकिंग गप्पा हा अनोखा परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम प्रामुख्याने नागरी सहकारी बँकांमधील पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसाठी आयोजित केला होता.
या परिसंवादाचे सूत्र संचालन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर अनास्कर यांनी केले तर या चर्चासत्रात रिझर्व्ह बँकेचे संचालक मा. श्री सतिश मराठे, गोखले इन्स्टिटयूटमधील आरबीआय चेअरपर्सन डॉ. श्री रबी मिश्रा, एनकेजेएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सीए प्रणाली धारधर. कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष सीए मिलिंद काळे, अॅड. सुभाष मोहिते यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांचे प्रश्नांना उत्तरे दिली.
सदर चर्चा सत्राचे सूत्र संचालक श्री विद्याधर अनास्कर यांनी अत्यंत खुबीने व्यासपीठावरील व समोर बसलेल्या सहभागींना आपले विचार व्यक्त करण्याची व व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. या वेळी नागरी सहकारी बँकांचे विविध प्रश्नांवर चर्चा होत असताना नागरी सहकारी बँकांची संख्या व त्यांचे घटलेले प्रमाण व त्याची कारणमिमांसा याची चर्चा करताना बँकांची झालेली प्रगती यावरही प्रकाश टाकण्यात आला. हे करत असतानाच केंद्र व राज्य शासनाचे नागरी सहकारी बँकां बाबत धोरण, त्यातील त्रुटी व बदललेल्या अपेक्षा यावरही चर्चा झाली. तसेच नागरी सहकारी बँकांचे संचालक पदाचा कालावधी व यासाठी देऊ केलेला कुलींग पिरियड त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांचे विलिनीकरण व त्यामागची रिझर्व्ह बँकेची भूमिका, रेग्युलेटरी म्हणून रिझर्व्ह बँकेचे अधिकार, कार्पोरेट गर्व्हनन्स, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर, बँकांचे नेतृत्व, समाज घटकांच्या अपेक्षा, स्थानिक नेतृत्व, बँकांच्या कर्मचा-यांची सुरक्षितता आदी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा रंगल्या. त्यामधून बँकांचा काल, आज आणि उद्या या बाबत असलेल्या शंकांचे निरसन झाल्याचा अभिप्राय अनेक सहभागी मान्यवरांनी नोंदविला
या कार्यक्रमासाठी वरील मान्यवरांशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. सीए भाऊ भगवंत कड, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोएिशनचे अध्यक्ष मा. श्री. निलेश ढमढेरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये जेष्ठ बैंकर डॉ. दिलीप देशमुख यांनी लिहिलेल्या Banking Updates for UCB’s या पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील तज्ञांचे उपस्थितीत करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष श्री श्रीधर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी या चर्चासत्राचे स्वरुप व उद्देश सांगत असतानाच बँकेच्या ७५ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.
बँकेचे जेष्ठ संचालक श्री बबनराव भेगडे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी आभार प्रदर्शन केले. बँकेचे उपाध्यक्ष श्री बिपीनकुमार शहा, सर्वश्री संचालक सदस्य सीए जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, डॉ रमेश सोनावणे, मिलिंद वाणी, विश्वनाथ जाधव, संजीव असवले, सौ निशा करपे, स्वीकृत तज्ञ संचालिका सौ श्वेता ढमाळ, बोर्ड ऑफ मनेजमेंट सदस्य श्री अरुण डहाके, श्री राजेंद्र गांगर्डे, श्री उदय जगताप, कौस्तुभभेगडे आदीनी चर्चासत्रात सहभागी होऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.






