तळेगाव दाभाडे येथे बकरा ईद उत्साहात साजरी प्रेषित इब्राहिम (अ.स.) यांची निष्ठा, समर्पण, त्यागाला अनुसारण्याचे आवाहन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात ईद उल अजहा अर्थात बकरा ईद उत्साहाने गुरुवारी (ता.28) साजरी करण्यात आली.

स्टेशन भागातील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये सकाळी दोन सत्रात ईदची नमाज झाली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख अय्युब सिकिलकर, सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद, ऍड. रियाज तांबोळी, ऍड. सैफ खान, मराठी मुस्लिम संघाचे संस्थापक अमिन खान, डॉ. तौसिफ शेख,नगरसेवक आमिर मुलाणी आदींनी शुभेच्छा दिल्या. मौलाना मोहम्मद आणि मौलाना शाहिद यांनी नमाज आणि खुतबा (प्रवचन) पठण केले. पैगंबर मोहम्मद पैगंबर (स.स.) यांनी दिलेल्या मानवतेच्या मार्गावर सर्वांनी वागावे आणि बकरा ईदला बलिदानाचा सण म्हणून प्रेषित इब्राहिम यांची अल्लाह प्रति असलेली निष्ठा, समर्पण आणि त्यागाला अनुसरून साजरा केला जातो, त्यास अनुसरून वागावे, असे मौलाना शाहिद यांनी प्रवचनादरम्यान सांगितले.

मुस्लिम कुटुंबातील महिलांनी एकत्र येत घरात ईद नमाज अदा केली.

Advertisement

 

गाव भागातील ईदगाह मैदानावर मौलाना शाहिद सिकिलकर यांनी नमाज पढवली. यावेळी पंचक्रोशीतील मुस्लिम आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामा मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त समीर नालबंद, सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई सिकिलकर, माजी नगरसेवक गनिमिंया सिकिलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई मुलाणी यांनी गळाभेट घेत समाजबांधवाना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या.

 

इतर अनेक समाजातील मित्र आणि हितचिंतकांनी मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

चौकट: कही कुर्बाणी तर कही शिक्षणासाठी देणगी

 

विशेष म्हणजे यंदा तळेगाव दाभाडे येथील अनेक मुस्लिम बांधवानी बकरा कुर्बाणी न करता आर्थिक कुर्बाणी देत सर्व समाजातील मुलामुलींच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी मदत केली. मुस्लिम समाजसुधारणा चळवळीचे प्रमुख पैगंबर शेख यांच्या इस्लाही सोशल फाउंडेशन फाउंडेशनच्या सहकार्याने ही मदत पोच केली जात असल्याचे मराठी मुस्लिम संघाचे प्रमुख अमिन खान यांनी सांगितले. पैगंबर शेख यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page