आळंदीत मामासाहेब मोहोळ धर्मशाळे समोर दुर्दैवी अपघात ; पाण्याच्या टँकरचे खाली आल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू मोटार सायकलचा तोल गेल्याने अपघात
आळंदी, दि. १४ ( प्रतिनिधी ) : आळंदी येथील मामासाहेब मोहोळ धर्मशाळे समोरून जात असताना पाण्याचा टँकर चे चाकाखाली दुसऱ्या वाहनाचा तोल गेल्याने त्या वरील महिला पाण्याचे टँकरचे खाली आल्याने टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने जबर अपघात होऊन या दुर्दैवी घटनेत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आळंदीतील हरिपाठ उद्यानाचे अलीकडे हा अपघात सायंकाळी सहाचे सुमारास झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. एकाचा आठवड्यात दोन अपघात होऊन एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण या दुर्दैवी अपघातात ठार झाले. चऱ्होली खुर्द रस्त्यावर हा अपघात आळंदी हद्दीत झाला. गुरुवारी ( दि. १४ ) सायंकाळी आन्नपूर्ण माणिकराव रोकडे ( वय ६३, रा. विकास वाडी, धानोरे फाटा, ता. खेड, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे सहाचे सुमारास हरिपाठ उद्याना जवळील गणपती मंदिर चौका जवळ हा अपघात झाला. मोटार सायकल स्वाराचा अचानक तोल गेल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. याच सुमारास समोरून येत असलेल्या पाण्याच्या टँकर खाली आन्नपूर्ण रोकडे या आल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्या वरून पाण्याच्या टँकरचे चाक गेल्याने या दुर्दैवी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्याचे कळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. तात्काळ आळंदी पोलिसांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली. नागरिकांत येथील रस्ते विकास प्रलंबित राहिल्याने तसेच वाढती रहदारी आणि फुटपाथ चे प्रलंबित राहिलेले कामातून रहदारी, पादचारी यांना सुरक्षित रहदारी साठी तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.





