पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दिले किल्ल्याचे नाव

SHARE NOW

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे (क्षेत्रीय कार्यालये) पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. प्रभाग समित्यांचे कार्यालयांना किल्ल्यांचे नाव देखील देण्यात आले आहे.

 

प्रशासनिक सोयीसाठी व नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे देण्यासाठी महानगरपालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या स्थापन करण्याबाबत १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अन्वये ३२ निवडणूक प्रभागांची विभागणीदेखील प्रभागनिहाय करण्यात आली आहे. प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेबाबतचा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

 

क्षेत्रीय कार्यालयाचे नाव, पत्ता व त्या अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक

 

अ क्षेत्रीय कार्यालय (राजगड ) – संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण, निगडी ४११०४४ – प्रभाग क्र. १३,१४ व १५

Advertisement

 

ब क्षेत्रीय कार्यालय (सिंहगड ) – लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव ४११०३३ – प्रभाग क्र. १७,१८ व १९

 

क क्षेत्रीय कार्यालय (विजयदुर्ग ) – हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी ४११०२६ – प्रभाग क्र. २, ९ व १०

 

ड क्षेत्रीय कार्यालय (देवगिरी) – औंध-रावेत रोड, रहाटणी ४११०१७ – प्रभाग क्र. २१, २७, २८ व २९

 

ई क्षेत्रीय कार्यालय (शिवनेरी) – पांजरपोळ संस्थे समोर, नाशिक रोड, भोसरी ४११०३९ – प्रभाग क्र. ३,४ व ५

 

फ क्षेत्रीय कार्यालय (तोरणा) – नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत लोकमान्य टिळक चौक, निगडी ४११०४४ – प्रभाग क्र. १,११ व १२

 

ग क्षेत्रीय कार्यालय (पुरंदर) – नविन प्रशासकिय इमारत, दिलिप वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी मागे थेरगाव, पुणे-३३ – प्रभाग क्र. २२,२३ व २४

 

ह क्षेत्रीय कार्यालय (प्रतापगड) – कासारवाडी येथील महिला आय.टी.आय इमारत – प्रभाग क्र. ३०,३१ व ३२

 

ज क्षेत्रीय कार्यालय (रायगड)- स.नं २७, मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे, पुणे ४११ ०३३ – प्रभाग क्र. १६,२५ व २६

 

ल क्षेत्रीय कार्यालय (लोहगड)- म्हाडा, प्लॉट नं ई-२, संत तुकाराम नगर, पोलिस स्टेशन समोर, पिंपरी पुणे ४११ ०१८ – प्रभाग क्र. ६,७,८ व २०


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page