शालांत परीक्षेत सरस्वतीची आकांक्षा दिवे मराठी माध्यमात प्रथम व मावळ तालुक्यात दुसरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

शालांत परीक्षा 2025 -26 अंतर्गत सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून आकांक्षा अंकुश दिवे ही विद्यार्थिनी 97.60% गुण मिळवून शाळेत प्रथम व मावळ तालुक्यात दुसरी आली आहे व तिला संस्कृत मध्ये 100 पैकी 100 व गणितात 98 गुण आहेत. ओंकार काशिनाथ भोईटे हा विद्यार्थी 95.80% गुण मिळवून शाळेत दुसरा आला असून चैतन्य अमोल देशपांडे हा विद्यार्थी 94.20% गुण मिळवून शाळेत तिसरा आला आहे .त्यालाही संस्कृत मध्ये शंभर पैकी शंभर गुण आहेत. एकूण 95 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 47 विद्यार्थी विशेष प्राविण्य ,34 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 14 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 12 विद्यार्थ्यांना 90% चे वर गुण प्राप्त झाले आहेत. शाळेने आपल्या शंभर टक्के निकालाची व मावळात प्रथम तिघांमध्ये येण्याची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश झेंड, उपाध्यक्ष श्री दिलीप कुलकर्णी, कार्यवाह श्री प्रमोद देशक, अंमलबजावणी अधिकारी श्री अनंत भोपळे, खजिनदार सुचित्राताई चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर, कार्यकारिणी सदस्य श्री विश्वास देशपांडे, सदस्य श्री सुनील आगळे, श्री चंद्रशेखर साठे, मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page