निधन वार्ता शकुंतला भेगडे यांचे निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील

शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील आदर्श माता शकुंतला (काकू ) प्रभाकर भेगडे (वय ८३) यांचे रविवारी (दि.३) पहाटे तीनच्या सुमारास

वृद्धापकाळाने दुःखद

निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.त्यांच्या मागे पती, चार मुले, दोन मुली,पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी प्रभाकर भेगडे

यांच्या त्या पत्नी, सामाजिक कार्यकर्ते अंकुश भेगडे, मोहन, सर्वेश, भास्कर भेगडे यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार विलास भेगडे यांच्या त्या चुलती होत. रविवारी सकाळी श्री बनेश्वर स्मशानभूमीत

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले,

“शकुंतला काकू यांनी एकत्र कुटुंबात संसाराचा गाडा हाकताना अपार कष्ट केले. त्या सुसंस्कारित जीवन जगल्या. आपल्या डोक्यावरील पदर कधी ढळू दिला नाही. या आदर्श मातेने दिलेली शिकवण विसरता येणार नाही. काकूंच्या निधनाने भेगडे परिवार आणि त्यांचे नातेवाईकांना झालेले दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी.”

Advertisement

यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम बापू कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद पानसे, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, अरुण भगवान भेगडे

आदींनी शोक भावना व्यक्त केल्या. यावेळी

किसान मोर्चा भाजपचे

प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी तहसीलदार रामभाऊ माने, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,

नगरसेवक इंद्रकुमार ओसवाल, माजी नगरसेवक

चंद्रकांत काकडे,अरुण भेगडे पाटील, आनंद गुलाबराव भेगडे,ॲड. श्रीराम कुबेर, संदीप काकडे,लक्ष्मण माने, नामदेवराव भसे, दत्तात्रय नाटक,

माजी नगरसेविका रत्नाताई भेगडे,

शोभाताई भेगडे

यांच्यासह सामाजिक ,राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोहर नगर येथे निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे, संदीप काकडे, विठ्ठलराव भेगडे , बाळतात्या भेगडे ,सुदूंबरे गावचे माजी उपसरपंच सुरेश गाडे, बबनराव जगदाळे, शिवाजी घोजगे, सुखदेव गाडे, ॲड. रामदास काजळे, सुरेश घोजगे, पांडुरंग पोटे, चेतन गराडे, रुपेश दिघे

आदी मान्यवर उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page