नसरापूर प्रकरणाने संताप उसळला; नवले पुलावर रास्तारोको ‘न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही’—स्थानिकांचा निर्धार

SHARE NOW

पुणे :

नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून संतप्त नागरिकांनी आज नवले पूल येथे रास्तारोको आंदोलन छेडले. या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. काल रात्री सदर प्रकार घडला.

 

आंदोलनकर्त्यांनी ‘न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही’ अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. रस्तारोकोमुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Advertisement

घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

 

दरम्यान, या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page