न्यू इंग्लिश स्कूल प्राथ. शाळेत इयत्ता पहिलीचा सेमी इंग्रजी वर्ग सुरु

SHARE NOW

वडगांव मावळ -रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर येथे इयत्ता पहिलीचा सेमी इंग्रजी वर्ग 1 एप्रिलपासून सुरु करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासन आदेशानुसार हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहीती शाळेचे कार्यतत्पर ज्येष्ठ शिक्षक किरण नवले यांनी दिली. चिमुकल्या विद्याथ्यांच्या स्वागताने शाळेचा परिसर गजबजून गेला होता. विद्याथ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी रयत शिक्षण संस्था प्रशासन सातत्याने प्रयत्नशिल असून इ.पहिलीच्या प्रवेश प्रक्रीयेला यावर्षी एप्रिलपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यत वयाची सहा वर्षै पूर्ण करणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी वडगांव मावळची ही शाळा गावाच्या अभिमानाची ठरली आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत करण्यास उत्सुक आहेत. गतवर्षी एम.टी.एस, आय.टी.एस., कर्मवीर विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षेत विद्याथ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. तसेच वक्त्ृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही विद्याथ्यांनी यश संपादन केले आहे. शाळेत अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग कार्यरत असून, येथील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालकांनी गावातीलच शाळेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल माध्य. व ज्यु. काॅलेजचे प्राचार्य श्री. सतिश हाके यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार खाडे यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किरण नवले यांनी केले, तर आभारप्रदर्शन निलेश गवई यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान कादे, उपाध्यक्षा सौ. पुष्पा तुर्डे, सदस्य रोहीत गवस, स्वप्निल उभे, किरण मोरे पुजा घाटोळे, शिक्षिका सुमन दळवी, सारिका अवचरे, कलावती काळडोके, किर्ती वहीले, वैष्णवी नांगरे, रिमा शिंदे, रेश्मा गायकवाड, सोनु गजभिव यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचलन श्री. किरण नवले सर यांनी केले.*


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page