जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षेत विद्या मंदिर सिमालवाडी शाळेचे घवघवीत यश…
कोल्हापूर :
जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग ( प्राथमिक )यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्या मंदिर सिमालवाडी ( ता – भुदरगड, जि – कोल्हापूर ) शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. मयुरेश आनंदी श्रावण डाकरे याने मिशन अंकुर परीक्षेत 100 पैकी 98 गुण मिळवून वेसर्डे केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच कु. श्रीधर आश्विनी संदीप डाकरे याने 100 पैकी 88 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच कु. प्रणव प्रियांका प्रदीप रब्बे हा इयत्ता सातवीचा विद्यार्थी बॅरिस्टर खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षेत 234 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 19 वा, तर तालुका गुणवत्ता यादीत 8 वा आला.
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे सिमालवाडी शाळेची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री. प्रबोध कांबळे यांनी शाळेला भेट देऊन या विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी श्री. प्रबोध कांबळे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण तवटे सर,
शिक्षिका आरती घाडगे, श्री. सुरज सोळंके सर व शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन लाभले.






