“जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनात खासदारांना डावलल्याचा आरोप; आंदोलनाचा इशारा!”

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेच्या वतीने यशवंतनगर भागात जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा शासकीय कार्यक्रम असतानाही मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या नावाचाही उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

या घटनेमुळे राजकीय वातावरणात नाराजीचे पडसाद उमटले असून, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल लोखंडे आणि शिवसेना युवा सेना तालुका संपर्क प्रमुख प्रशांत तावरे,शिवसेना तळेगाव दाभाडे शहर प्रमुख देव खरतमल यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

यापुढेही अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना डावलले गेले, तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page