भगवान महावीरांचा संदेश प्रत्येकाने अंमलात आणावा. मा संतोष दाभाडे पाटील
तळेगाव दाभाडे :
भगवान महावीर स्वामी यांचा “जिओ और जिने दो” हा संदेश प्रत्येकाने अमलात आणावा असे आवाहन तळेगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी भगवान महावीर जन्म कल्याण दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार प्रसंगी जैन भवन तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमात केले.
तळेगाव शहरातील जैन समाजाचे शहराच्या विकासात फार मोठे योगदान आहे शहराच्या विकासाबरोबरच सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा क्षेत्रात जैन समाजाने भरीव कामगिरी केलेली आहे.जैन समाज हा नेहमी हात मोकळे करून पुण्याचं काम करण्यात पुढे असतो तो कधीही कोणाकडे काही मागत नाही त्याची नेहमी दान करायची भूमिका असते असे गोरोवोद्गार नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी याप्रसंगी केले.
मॉल संस्कृतीला फाटा देऊन आपण सर्वांनी आपल्या शहरातील आपल्याच व्यापारी बांधवांकडून खरेदी करावी असेही आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
याप्रसंगी तळेगाव जैन समाजाचे मार्गदर्शक इंद्रकुमार ओसवाल यांची नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी तळेगाव शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक विक्रम दाभाडे पत्रकार माडगूळकर साहेब ,विजयजी सुराणा,विलासराव भेगडे,जैन समाजाचे विश्वस्त अनिल मेहता,भवरमल संघवी,रमेश निबजीया,दिनेश वाडेकर रिकबचंद गुन्देशा, प्रकाश ओसवाल हे उपस्थित होते.
तळेगाव शहरातील जैन समाजाचे वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शोभा यात्रेमध्ये पुरुष व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता शोभा यात्रेच्या समारोपप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले.
विविध वेशभूषा करून लहान मुले शोभायात्रेत सहभागी झाल्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
शोभा यात्रेतील प्रसादाचे आयोजन प्रियवंदाबेन इंद्रलाल शहा यांच्या वतीने तर पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मेहता यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश ओसवाल यांनी आभार प्रदर्शन दिनेश वाडेकर यांनी केले.






