माऊली मंदिरात एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट लक्षवेधी ; इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीच्या आरती

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) :

आळंदी येथील भागवत एकादशी ( पापमोचनी ) निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर महिलांसह भाविकांची इंद्रायणी आरतीस गर्दी झाली होती. इंद्रायणी आरे सेवा समिती, आळंदी देवस्थान – आळंदी नगरपरिषद, देहू आळंदी परिसर विकास समिती यांनी स्वतंत्र इंद्रायणी आरती करून स्थान माहात्म्य जोपासले.

आळंदी मंदिरात भाविकांनी एकादशी दिनी गर्दी करीत रांगा लावून हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी संस्थानचे विश्वस्त पदाधिकारी, व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने सरकार, सेवक, कर्मचारी, मानकरी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी यांनी नियोजन करीत भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन सुलभ देण्यासाठी परिश्राम घेतले. आपापली काळजी घेऊन भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या. दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने देहूकर यांचे तर्फे कीर्तन सेवा, रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.

आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वयीन वाहतूक सेवारत कर्मचारी यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून मुक्तता झाली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. मात्र दुचाकी वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दंडात्मक कारवाईने भाविकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. वाहन पार्किंग ची सोय प्रथम करून मग बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी. पार्किंग कुठे करायची यावर जनजागृती आणि राखीव पार्किंग जागा यावर कामकाज करून दंड वसूल व्हावा. केवळ दंड करून वाहतूक सुरळीत होणार नसल्याचे सांगत भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

आळंदीत भागवत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती

येथील आळंदी नगरपरिषद – आळंदी देवस्थान यांनी संयुक्तिक तसेच इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती उत्साहात झाली. एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर सकाळी नगरपरिषदेच्या वतीने नदी घाट व परिसर स्वच्छता करण्यात आला.

इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी चला जानूया नदीला उपक्रमात अनेक निरीक्षणे घेत इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजानासाठी सविस्तर निवेदन देण्यात आले. यावर उपाय योजना करण्याची मागणी आळंदी जनहित फाऊन्डेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे जिल्हा नियोजन विभाग यांनी आळंदी नगरपरिषदेस सविस्तर कार्यवाही करून अहवाल देण्याचे सूचित केले आहे.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम,अमर गायकवाड, गोविंद ठाकूर तौर, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, कौशल्या देवरे, शालन कुरधोंडकर, विद्या आढाव, शकुंतला चोपडे, अनिता पोतदार, दमयंती आर्दड, रीनाताई पवार, मेघा काळे आदीं सह ग्रामस्थ महिला भाविक उपस्थित होते.

इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे मागणी साठी विविध लक्षवेधी सूचना करण्यासाठी तत्कालीन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन दिले असून त्यावर नवनियुक्त मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी कामकाज करण्यासाठी नियोजन विभाग प्रमुख इंदलकर यांनी कळविले आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा यांना देखील इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याचे कार्यात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने राजमाता जिजाऊ महिला महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सेवाभावी संस्थानी इंद्रायणी आरती उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. आळंदी देवस्थान – आळंदी नगरपरिषद यांचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी इंद्रायणी घाटावर स्वच्छता आणि लक्षवेधी रांगोळी काढून भिविकांचे लक्ष वेधण्यात आले. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर यांचे नेतृत्वात इंद्रायणी घाटावर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. वेदमंत्र जय घोषित इंद्रायणी आरती प्रसंगी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, चैतन्य लोंढे कबीरबुवा, रोहिणी पवार, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, आळंदी नगरपरिषदेचे पदाधिकारी, आळंदी ग्रामस्थ, वारकरी भाविक उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page