उद्योग–शिक्षण सहकार्याचा नवा टप्पा; यशोदा काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा PHN टेक्नॉलॉजीसोबत MoU

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील Indrayani Vidya Mandir संचलित Yashoda Mahadeo Kakade College of Engineering यांनी PHN Technology सोबत औपचारिक सामंजस्य करार (MoU) करून उद्योग–शैक्षणिक सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-ओरिएंटेड प्रशिक्षण, इंटर्नशिप, लाइव्ह प्रोजेक्ट्स, कार्यशाळा तसेच कौशल्यविकासाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक अनुभव वाढून ते स्पर्धात्मक युगात अधिक सक्षमपणे उभे राहू शकतील.

संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, सचिव चंद्रकांतजी शेटे, खजिनदार निरुपा कानिटकर तसेच सर्व मान्यवर विश्वस्त यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि सातत्यपूर्ण पाठबळामुळे संस्था सातत्याने शैक्षणिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करत आहे.

Advertisement

या प्रसंगी उपप्राचार्या डॉ. अमृता सुराणा यांनी या कराराचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना होणारे विविध फायदे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि रोजगारक्षमता अधिक बळकट होईल तसेच त्यांच्या करिअर घडणीस नवी दिशा मिळेल.

महाविद्यालयाच्या प्रगतीच्या वाटचालीत हा MoU एक मैलाचा दगड ठरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच भविष्यात सकारात्मक परिणाम घडविणारे ठरणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page