कामशेत येथे विशेष नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

SHARE NOW

कामशेत :

कामशेत येथे विशेष नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

१८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी कामशेत येथे विशेष मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि अधिकाधिक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

हे अभियान दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत श्री गणेश मंदिर, इंद्रायणी कॉलनी, कामशेत येथे पार पडणार आहे.

Advertisement

या अभियानात १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व पात्र युवक-युवतींनी सहभागी होऊन आपली मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड (मूळ व छायांकित प्रत)

पासपोर्ट साईज फोटो

आई किंवा वडिलांचे मतदान कार्ड / आधार कार्ड

घराचे चालू महिन्याचे वीज बिल

आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक

या अभियानासाठी दत्तात्रय विठ्ठल शिंदे (माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, खडकाळे-कामशेत) तसेच अड. चेतन मोहन वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

9960362619 / 8087446157

“लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी, आजच करा मतदार नोंदणी!” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page